निखिलम् - भाग 2
निखिलम्|
प्रिय निशिकांत,
‘निखिलम्’ची ओळख करून घेताना तुझ्या हे लक्षात आलंच असेल की, आपण
पायाजवळच्या आणि पायापेक्षा थोड्या लहान संख्या निवडल्या. आज आपण तेच ‘निखिलम्’ 12
* 13 साठी वापरून पाहू.
मागच्याच नियमांप्रमाणे
कितपत पुढे जाता येतंय ते पाहू.
STEP 1 - गुण्य आणि गुणक यांना जवळचा 10 चा घात पाया मानू.
इथे पाया 10.
STEP 2 - आता गुणाकाराची मांडणी.
12 : 12 – 10 = +2
13
: 13 –
10 = +3
/
STEP 3 -
आता पुन्हा मांडणी.
12 : +2
13 : +3
\
उत्तराचा डावा भाग मिळवण्यासाठी -
(1) 12 + (+3) = 15 किंवा
(2) 13 + (+2) = 15 किंवा
(3) 13 + 12 = 25 आणि 25 – पाया = 25 – 10 = 15 किंवा
(4) (+3) + (+2) = +5 आणि पाया +
(+5) = 10 + (+5) = 15.
थोडक्यात उत्तराचा डावा भाग = 15.
उत्तराचा उजवा भाग मिळवण्यासाठी –
(+2) * (+3) = +6.
STEP 4 –
12 : +2
13 : +3
15 \ 6
अंतिम उत्तर = 15 * पाया + 6 = 15*10 + 6 =
150 + 6 = 156.
किंवा
पाया 10 म्हणून उजव्या भागात (10 त शून्य 1
म्हणून) एकच अंक हवा, याप्रमाणे 6 आहे म्हणून अधिक बदल न करता उत्तर सरळ 156.
मागच्याच
पध्दतीने अगदी शेवटपर्यंत गणित अचूक सोडवता आले.
आणखी
काही उदाहरणे पाहू.
102*105. 112*107.
पाया
= 100. पाया = 100.
102
: +2 112 : 12
105
: +5 109 : 09
107
\ 10 121 \ 108
=
10710. = (121+1) \ 08
= 122 \ 08
= 12208.
1013*1007
पाया
= 1000.
1013
: 013
1007
: 007
1020
\ 091
=
10,20,091.
म्हणजे
मागच्याप्रमाणे तुझ्या ‘असंच का’च उत्तर हे
1013*1007
= (1000 + 13)*(1000 + 7)
= 10,00,000 + 1000(13 + 7) + 13*7
= 10,00,000 + 1000(20) + 91
= 10,00,000 + 20,000 + 91
= 10,20,000 + 91
असे
आले 10,20,091.
आता
याचप्रमाणे तूही सोडवून बघ. आणि मागच्याप्रमाणे mail कर.
(1)
15*17
(2)
121*104
(3)
1008*1006
(4)
10011*10011 (वर्ग करणं सोपं आहे ना!)
(5)
100003*100002
(6)
1001008*1001006 (ह्याचा अर्धा भाग तू (3) मध्ये सोडवलाच आहेस.)
(7)
102*98.
तुझी,
ऋचा.
Comments
Post a Comment