निखिलम् - भाग 1
निखिलम् । प्रिय निशिकांत, ‘एकाधिकेन’ची काही उदाहरणं सोडवताना तुला उत्तराच्या डाव्या भागातल्या गुणाकाराशी जरा झुंजावं लागलं, हे माझ्या लक्षात आलं; म्हणूनच आपण ह्या गुणाकाराशी तह करूया. वैदिक गणितातली गुणाकाराची पहिली पध्दत म्हणजे ‘निखिलम्’ सूत्र. ते पाहण्याआधी काही संज्ञा स्पष्ट करून घेऊ. गुण्य – म्हणजे ज्याला गुणायचे ती संख्या. गुणक – म्हणजे ज्याने गुणायचे ती संख्या. गुणाकार = गुण्य x गुणक. गुणाकारात गुण्य आणि गुणक यांची आलटापालट केली तरी चालते. केवळ पध्दत किंवा convention म्हणून प्रथम येणार्या संख्येस गुण्य आणि नंतर येणारीस गुणक म्हणू. याबरोबरच लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे चिन्हांचे गुणाकार. + x + = + - x - = + + x - = - गुणाकाराचं सूत्र असं.. ‘ निखिलम् नवत: चरमं दशत: ।’ याचा अर्थ असा, ‘नऊमधून सगळं आणि दहामधून शेवटचं’. यावरून फारसा अर्थबोध होत नाही, तेव्हा उदाहरणावरून पाहू. 8 गुणिले 7. STEP 1 - सर्वात आधी गुण्य आणि गुणक यांना जवळचा असणारा 10 चा घात पाया मानायचा. आता गुणाकाराची याप्रमाणे ...