वर्गं च योजयेत् |
वर्गं च योजयेत् | प्रिय निशिकांत, तुला आठवत असेल आपण ‘एकाधिकेन पूर्वेण’पासून सुरूवात केली. त्यानंतर आपण गुणाकाराचं ‘ निखिलम्’ पाहू लागलो. खरं तर वर्ग करणं ही गुणाकार करण्याची एक special case झाली, ज्यात गुण्य आणि गुणक दोन्ही तीच संख्या असते. पण म्हणूनच वर्ग करताना आपण काही वेगळे short cuts सहजपणे वापरू शकतो. ‘एकाधिकेन पूर्वेण’ हे सूत्र खास शेवट 5 असणार्या संख्यांसाठी. आता आपण वर्ग करायचा दुसरा मार्ग पाहू. – यावदूनं तावदूनीकृत्य वर्गं च योजयेत्। ह्या सूत्राचा अर्थ असा की, जिचा वर्ग करायचा आहे ती संख्या आणि पाया ह्यांच्यातला फरक त्या संख्येतून वजा करायचा (हा झाला वर्गाचा डावा भाग) आणि फरकाचा वर्ग करायचा (हा झाला वर्गाचा उजवा भाग). नेहमीप्रमाणे उदाहरणावरून पाहू. 98 चा वर्ग करू. आधी वरच्या सूत्राप्रमाणे मांडून पाहू. पाया 100 मधून 98 वजा केले, फरक आला = 100 – 98 = 2 वर्गाचा डावा भाग = 98 – फरक = 98 – 2 = 96. वर्गाचा उजवा भाग = (फरक) 2 = 2 2 = 4. पण पाया 100 म्हणून 4 ऐवजी 04 लिहायचं...