निखिलम् - भाग 2
निखिलम्| प्रिय निशिकांत, ‘निखिलम्’ची ओळख करून घेताना तुझ्या हे लक्षात आलंच असेल की, आपण पायाजवळच्या आणि पायापेक्षा थोड्या लहान संख्या निवडल्या. आज आपण तेच ‘निखिलम्’ 12 * 13 साठी वापरून पाहू. मागच्याच नियमांप्रमाणे कितपत पुढे जाता येतंय ते पाहू. STEP 1 - गुण्य आणि गुणक यांना जवळचा 10 चा घात पाया मानू. इथे पाया 10. STEP 2 - आता गुणाकाराची मांडणी. 12 : 12 – 10 = +2 13 : 13 – 10 = +3 / STEP 3 - आता पुन्हा मांडणी. 12 : +2 13 : +3 \ उत्तराचा डावा भाग मिळवण्यासाठी - (1) 12 + (+3) = 15 किंवा (2) 13 + (+2) = 15 किंवा (3) 13 + 12 = 25 आणि 25 – पा...