Posts

Showing posts from 2014

एकाधिकेन पूर्वेण |

एकाधिकेन पूर्वेण I प्रिय निशिकांत,       आपलं आपलं असं म्हणून आपण ज्या संस्कृती, संस्कृत, वेद, गणित यांबद्दल बोलतो, त्याबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आणि जाणीव आहे, असा मला प्रश्न पडतो. समजून घ्यावं आणि आत्मसात करावं असं बरंच काही सापडेल हे माहीत असतं एका बाजूला, तरीही जुनं काहीतरी नव्याने शोधण्याचा उत्साह मात्र उफाळून येत नाही. एका अर्थाने कष्टाचं आणि जिद्दीचंच काम हे. पण समजावून घ्यायचं ठरवलंच, तर कुठे पुराण वगैरे वाचत बसावं किंवा जंगलात जावं लागेल असंही नाही. कुठूनतरी सुरुवात करायची आणि सोपं असलेलं सोपं असतानाच समजावून घ्यायचं. तर झालं असं.. सुट्टी म्हणल्यावर घरच्यांनी सालाबादप्रमाणे घर आवरण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आणि जुन्या कपाटांनी नि:श्वास सोडला. त्यातच मला वैदिक गणिताची जुनी, अगदी पिवळी पडलेली पुस्तकं सापडली. हे गणित म्हणजे काहीतरी भारी असतं आणि जादू केल्यासारखी वेगात समीकरणं सोडवणारी माणसं असलंच गणित वापरतात, हे माहीत होतं; पण आजपर्यंत नेटाने ते संपूर्ण समजावून घेतलं, असं मात्र झालं नाही. माझं लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच ग...